आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढरपूर:आता दिवसभरात तीन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे मुखदर्शन

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विठ्ठलाचे मंदिर २४ तास खुले राहणार असल्यामुळे आता ३ हजार भाविकांना शनिवारपासून विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येईल, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org/home.html या संकेतस्थळावरून भाविकांना ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य आहे. भाविकांकडून होणारी मागणी विचारात घेऊन २८ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत भाविकांची संख्या तीन हजार करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्यासाठी दिवसभरात १५ तासांचे स्लॉट (भाग) निश्चित करण्यात आले आहेत. एका तासात आता २०० भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. ४ डिसेंबरपासून पुढे ऑनलाइन मुखदर्शन पास बुकिंगबाबत स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असे मंदिर समितीकडून कळवण्यात आले आहे. या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser