आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रौप्य महोत्सवी अधिवेशनचे आयोजन:आता समाजाचे अर्थकारण सुधारण्याकडे विशेष लक्ष, प्रवीण गायकवाड यांनी दिली माहिती

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुजन समाजाची लोकसंख्या मोठी आहे, परंतु या समाजाचे अर्थकारण मात्र कमी असल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. ज्या समाजाच्या जिवावर आपण काम करतो, नेतृत्व करतो, त्यास नवीन दिशा, विचार निर्माण करणे ही चळवळीची भूमिका आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या टीका करणे, विद्वेष पसरवण्यासाठी संभाजी ब्रिगेड कार्यरत नाही. तर पुढील २५ वर्षांमध्ये आमच्या समाजाचे, संघटनेचे अर्थकारण बदलेले पाहणार आहे, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संभाजी ब्रिगेड संघटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, येथे २८ डिसेंबरला संघटनेचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आयोजित केले आहे. त्यासंदर्भात संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गायकवाड गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘या अधिवेशनासाठी छत्रपती घराण्यातील प्रमुख लोकांना विशेष निमंत्रित केले आहे. या अधिवेशनात एकूण तीन सत्रे होणार आहेत.’

बातम्या आणखी आहेत...