आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​थाटही अन् सोयही:आता गौराईचा नैवेद्यही तयार मिळणार ; महिला घेताहेत निवडलेल्या भाजीचा पुडका

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी करणाऱ्या परंतु परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या महिलांसाठी गृह उद्योगातील महिलांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. गौराईसाठी पुरणाचा स्वयंपाक, १६ भाज्यांचा पुडका, मागाल ते गोड पदार्थ आणि चटण्या, कोशिंबिरी असे तयार नैवेद्याचे पान केळीच्या पानावर वाढून घरी पोहोच करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. निवडून ठेवलेल्या भाज्यांचा पुडकाही तयार केला आहे.

गौराईच्या आवाहनापासून तिचे पूजन आणि विसर्जन या दिवसापर्यंत अनेक पदार्थांचा नैवेद्य गृहिणींना करावा लागतो. सुवासिनी यासाठी पाच ते सहा दिवस आधीच तयारीला लागतात. त्यात स्वच्छता असो किंवा मग आणखी कुठल्या दळण, कांडण, कुटणाची तयारी. दगदग, घाई होतेच. अशा महिलांच्या मदतीला अनेक सुगरणी धावल्या आहेत. कुलदैवत गौराई आणि श्रीगणेशा या सगळ्यांच्या नैवेद्याचा खर्च हा साधारण ३००० रुपये इतका आहे. त्यात केवळ केळीच्या पानावर नैवेद्य वाढणे एवढेच काम असणार आहे.

स्वच्छ केलेल्या १६ भाज्यांचा पुडका
गौराईच्या नैवेद्यात समाविष्ट असलेल्या १६ भाज्या निवडून तयार करून ते १२१ रुपयांत देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सोहळ्यातला स्वयंपाक असणाऱ्या महिलांना आपापल्या घरी भाज्या पोहोच मिळणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...