आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षीय मोर्चा:नूपुर शर्मा, जिंदाल यांच्या वक्तव्याचानिषेध करत निघाला सर्व पक्षीय मोर्चा ; नमाज पठणानंतर मुस्लिम समाज एकवटला, जोरदार घोषणाबाजी

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपाच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल या वक्तव्याचा निषेध करत सर्व पक्षीय मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच ‘नबी का दामन कभी नहीं छोडेंगे, उनके शान में गुस्ताखी बर्दास्त नही करेंगे...’ असा नारा देण्यात आला. यावेळी माकपने निषेध सभा घेतली तर जमियत उलमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. सर्व पक्षीय मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी नमाजनंतर मोर्चाची सुरुवात झाली. शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून मुस्लिम समाजबांधाव मोर्चात सहभागी झाला होता. अवघ्या काही मिनिटांत पासपोर्ट कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटपर्यंत गर्दी झाली. यावेळी शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी व एमआयएम शहराध्यक्ष हाजी फारुख शाब्दी यांनी मार्गदर्शन केले. माजी नगरसेवक तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, जीएम संस्थेचे बाळासाहेब वाघमारे, मतीन बागवान उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ जात असताना काही तरुण मंडळीने गोंधळ घातल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. उलमा-ए-हिंदचे निवेदन जमियत उलमा- ए- हिंदच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी निवेदन दिले. यावेळी मौलाना हारीस शेख, हसीब नदाफ, हाफिज युसूफ चकोले, युनूस डोणगावकर, अ. सत्तार दर्जी, मुश्ताक इनामदार, हाफीज महेमूद आदी उपस्थित होते. माकपची निषेध सभा माकपच्या वतीने पूनम गेटसमोर निषेध सभा घेतली. माजी आमदार नरसय्या आडम, शहर काझी मुफ्ती सय्यद अमजदअली काझी, एम. एच. शेख, सिध्दप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसूफ मेजर आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...