आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • OBC Data Collection, Go To Every House And Get Information; BJP's Demand To Change The Method Of Survey ऑसोीोूपग लाैे

मागणी:ओबीसी डाटा संकलन, प्रत्येक घरापर्यंत जाऊन माहिती घ्या; सर्वेक्षणाची पद्धत बदला भाजपची मागणी

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाबाबत शासनाच्या निर्देशानुसार सर्वेक्षण करण्यात येत आहे. आडनावावरून अंदाज न घेता प्रत्यक्ष मतदारांच्या घरापर्यंत जाऊन सर्व्हे करावा. आताच्या स्थितीनुसार सर्व्हे केल्यास ओबीसीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित सर्वेक्षणाची पध्दत बदलावी आणि योग्य सर्व्हे करावा, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मंगळवारी करण्यात आली.

ओबीसीचे आरक्षण मिळवण्यासाठी इम्पेरिकल डाटा संकलन करण्यात येत आहे. त्याचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश शासनाने दिले. पण बीएलओकडून अडनाव किंवा एका ठिकाणी बसून सर्व्हे करण्यात येत आहे. अनेक अडनावांचा सर्व जातीमध्ये समावेश आहे. त्यामुळे खऱ्या ओबीसीची माहिती मिळणे कठीण आहे. प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करावा, अशी मागणी शहर भाजपाच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली.

याबाबत निवेदन दिले. यावेळी शहराध्यक्ष विक्रम देशमुख, सरचिटणीस शशिकांत थोरात, रुद्रेश बोरामणी, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र काळे, शहरध्यक्ष राम वाकसे, प्रशांत फत्तेपूरकर, अनिल कंदलगी, भूपती कमटम, नागेश वल्याळ, श्रीनिवास जोगी, आनंद कोलारकर, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड आदी उपस्थित होते. संशय असलेल्या नावाबाबत खात्री करण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जाऊन माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले, त्यानुसार काम सुरु आहे. अशी माहिती आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...