आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:ओबीसी आरक्षणप्रश्नी रथयात्रा काढणार

मोहोळ2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • ज्योती क्रांती परिषदेचा निर्णय, मुंबईत होणार समारोप

ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण हे आता रस्त्यावर उतरून मिळवले पाहिजे. याप्रश्नी मुंबईच्या आझाद मैदानावर एल्गार करू, असा इशारा आज ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिला.

रविवारी येथे ओबीसी राजकीय आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विचारविनिमय बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी बारसकर बोलत होते. राज्यभरातून आलेले पदाधिकारी म्हणाले, येणाऱ्या काळामध्ये ओबीसींच्या न्याय हक्कासाठी रमेश बारसकर यांनी भूमिका निश्चित करावी. राज्यभरातील संपूर्ण ओबीसी समाज भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. यावेळी मच्छिंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य अरूण तोडकर, सुनंदा फुले, निलंगाचे शरद पेठकर, नगरसेवक अतुल क्षीरसागर, प्रवक्ते शिलवंत क्षीरसागर, मारूती रोकडे, ओंकार आडत, उस्मानाबादचे लोमेश काळे, बाळासाहेब चिकलकर, महेश माळी, सागर यादव, स्वप्निल जानराव, सागर कोळी, प्रशांत जाधव, अरविंद राऊत, माणिक पिसे, उमेश सारवडकर, कोल्हापूरचे संतोष देसाई, संगीता पवार, ज्योती ननवरे, अनिता बळवंतकर, सागर अष्टुळ, बाळासाहेब माळी, सुलतान पटेल, सिद्धार्थ एकमल्ले उपस्थित होते.

गावोगावी जाऊन प्रबोधन करणार
ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरामध्ये रथयात्रा काढण्यात येणार आहे. त्याद्वारे गावोगावी जाऊन समाज प्रबोधन करून आरक्षणाचा नफा-तोटा सांगितले जाणार आहेत. रथयात्रेचा समारोप मुंबईतील आझाद मैदानावर सभेने होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...