आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक:कोविड सेंटरमध्ये विद्यार्थिनींच्या कपड्यांवर कैद्यांकडून अश्लील लिखाण

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय तंत्रनिकेतन येथील मुलींच्या वसतिगृहात कोविड सेंटर असून तेथे कारागृहातील कैद्यांवर उपचार करण्यात आले. तेथील एका खोलीतील विद्यार्थिनींच्या कपड्यांवर अश्लील लिखाण केल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली. मुलींची वसतिगृहाची इमारत आहे. महापालिकेने कोविड सेंटरसाठी अधिग्रहण केल्याने तेथील विद्यार्थिनी आपले साहित्य कपाटात ठेवून गावी गेल्या. एका खोलीतील कपाट फोडून त्यात असलेल्या कपड्यांवर अश्लील लिखाण केल्याचे शनिवारी सकाळी निदर्शनास आले. याप्रकरणी संबंधित तुरुंग प्रशासनाला पत्र पाठवल्याचे मनपा उपायुक्त धनराज पांडे यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...