आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेजचे ;    चनशेट्टी दाम्पत्यास आमटे सेवावृत्ती पुरस्कार जाहीर

सोलापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेजचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी व नळदुर्ग येथील धरित्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता चनशेट्टी (शहा) यांना साधनाताई आमटे व बाबा आमटे सेवावृत्ती दाम्पत्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण १५ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील इसळक येथे होणार आहे. १० हजार रुपये रोख रक्कम, स्नेहालय येथील विद्यार्थ्यांनी बनवलेली कलाकृती, पुस्तके, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. उमाकांत चनशेट्टी अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाचे उपक्रमशील व प्रयोगशील प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. संगीता चनशेट्टी व डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी अक्कलकोट येथे युवक विकास संसद, समता सार्वजनिक वाचनालय, नळदुर्ग येथील अनाथ मुलांसाठी आपले घरची निर्मिती, बोरामणी येथे कै. ब. ई. चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठानची स्थापना करून महात्मा गांधी यांच्या कल्पनेतील नई तालीम शिक्षण प्रकल्प उभा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण, उद्योग व नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊन या पती-पत्नीचे समाजाला मोठे योगदान लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...