आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक मंगळागौर पूजेचा होतोय चकचकीत इव्हेंट:नववधूंच्या नव्या संसाराची पहिली पूजा, मात्र आता पूजा झालीय ग्लोबल

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावणातल्या दर मंगळवारी नववधूच्या हातून मंगळागौरीची पूजा केली जाते.शहरात मंगळवारी या पूजा कर्णयत आल्या. मात्र याचे धार्मिक महात्म्य बाजूला सारत सध्या मंगळागौरीच्या पूजेला चकचकीत इव्हेंट स्वरूप आलं आहे. शिवाय या मंगळागौरीच्या कार्यक्रमात हौस म्हणून आरोग्याच भान राखत केले जाणारे खेळ हे सध्या खेळ कमी होऊन सांघिक व्यावसायिक कला प्रकार अधिक बनले आहेत. यात काही महिला मंडळ हौस किंवा सेवाभाव वृत्तीने करतात तर काही मंडळ याला व्यावसायिक स्वरूप देत आहेत.

चांदीची मंगळागौर फुला पानाची म्हणजे पत्रीची शिवपिंड हे खरं मंगळागौरीचे रूप. घरीच केली जाणारी ही पूजा सध्या मंगल कार्यालयात होते घरीच केले जाणारे या पूजेतील पदार्थ केटरर्स कडून केले जात आहेत. शिवाय मंगळागौरीचा सगळ्यात महत्त्वाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाणाऱ्या मंगळागौरीच्या खेळाचा जागर म्हणून केला जाणारा कलाप्रकार आता हौस म्हणून कोणीही करत नाही. उलट कोण तयारी करणार अस म्हणत तयार संघांना बोलावून हे खेळ सादर केले जात आहेत. त्यात काही संघ सेवाभावी वृत्तीने हे कार्य करतात तर काही संघ हे त्याच्याकरिता सात ते दहा हजार रुपयांची मागणी करत त्याला व्यावसायिक स्वरूप देत आहेत.

असे आहे स्वरूप

सक्रिय संघ 8 प्रत्येक संघात महिला 12,

मानधन - 5 - 10 हजारापर्यंत,

डेकोरेशनसाठी होतोय हजारोचा खर्च,

सगळे काही रेडिमेड घरची गौर मंगल कार्यालायत नटतेय

खऱ्या फूलाऐवजी कागदी आरास

अनेक मोठ्या घरात या मंगळागौरीच्या पूजेला मोठ्या प्रमाणावर खर्च केले जात आहेत. काही फुलं बेलपत्री आणि इतर पानांच्या साह्याने खरतर ही पूजा सजवली जाते. मात्र आता यासाठी नव नव्या रंगांची आणि परदेशी फुल कागदी पण सजावटीसाठी आणली जात आहेत. तर काही ठिकाणी बनावट फुल आरासाच्या बाजूला मांडली जातात.त्यामुळे याची सात्विकता कमी होत चालली आहे.

अनेक कुटुंबांचे आमंत्रण असते

नाच ग घुमा मंगळागौर मंडळाच्या सरिता कुलकर्णी म्हणाल्या की,आम्ही दोन दोन महिने तालीम करतो त्यानुसार पारंपारिक गीतांमधून नृत्य सादर करतो जवळपास दोन-तीन तासांचा हा कार्यक्रम असतो. त्यासाठी आम्ही जो वेळ देतो त्याचाही खर्च होतो.

बातम्या आणखी आहेत...