आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गट गणांच्या आरक्षणात होणार बदल:जिल्हा परिषदेचे 2 गट, पंचायत समितीचे 4 गण होणार कमी, संधी गेल्याने हिरमोड झालेल्यांना दिलासा

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाने बुधवारी (दि. 3) झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 अन् जास्त जास्त 75 करण्यासह अधिनियम 1961 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे 77 ऐवजी 75 गट होणार होतील. तसेच, पंचायत समितीचे 154 ऐवजी 150 गण असतील. गट, गणांची संख्या कमी झाल्याने गट, गणांच्या रचनासह, आरक्षणामध्ये बदल होणार आहे. गेल्या आठवड्यातील गट, गणांच्या सोडतीमध्ये आरक्षणामुळे संधी हुकलेल्या काहींना पुन्हा संधी मिळण्यासह, काहींना ती गमावावी लागू शकते.

ग्रामीण भागातील लोकसंख्या घटत असल्याने गट, गणांची संख्या सुधारीत करण्यात निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तत्कालीन महा विकास आघाडी सरकारच्या कालावधीत 55 ते 85 पर्यंत गटांची संख्या वाढवण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सोलापूर जिल्हा परिषदेतील पूर्वीची 68 सदस्य संख्येत 11 सदस्यांची वाढ होऊन 77 गट तयार झाले होते. तसेच, पंचायत समितीचे 154 गण आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्याने 21 मार्च पासून त्या संस्थांवर प्रशासकीय कारभार आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मंजूर झाल्याने जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत गेल्या आठवड्यात झाली होती. त्यावर नागरिकांच्या हरकती घेण्यात आल्या असून पाच ऑगस्ट अंतीम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, बुधवारी (दि.3) राज्य शासनाच्या निर्णयामुळे झेडपीचे दोन गट, पंचायत समितीचे चार गण कमी होणार आहेत. त्या निर्णयानुसार राज्य निवडणूक आयोगाचे आदेश निघतील.

निवडणुकीचा तयारी सुरू

नुकत्याच जाहिर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व 7 गट महिलांसाठी राखीव झालेत. तसेच, माजी सदस्य, पदाधिकाऱ्यांचे अनेक गट आरक्षित झाल्याने सुरेश हसापुरे, विक्रांत पाटील, विजयराज डोंगरे, बळीराम साठे यांच्यासह अनेक मान्यवरांची राजकीय कोंडी झाली. काहींनी पंचायत समिती गणांतून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली तर काही इच्छुकांनी गटांमध्ये स्वत: ऐवजी पत्नी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली होती.

सोडत नव्याने काढणार

टेंभुर्णी नगरपंचायत, कुंभारी नगर परिषद करण्याचे प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत. जिल्हा परिषद गट रचनांमध्ये टेंभुर्णी व कुंभारी गटांची समावेश आहे. दोन गट कमी करावे लागणार असल्याने, त्या गटांना वगळले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन गट कमी झाल्यामुळे संपूर्ण आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...