आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​एसटीत विनातिकीट प्रवास, जागेवरच दुप्पट दंड; तपासणी मोहिमेसोबतच अधिकारी आणि कर्मचारी प्रवाशांत जागृतीही करणार

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाने एसटीमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम सुरू केली आहे. मात्र खरी गंमत ही आहे की, या मोहिमेदरम्यान विनातिकीट प्रवासी आढळल्यास संबंधितांकडून चुकवलेल्या भाड्याव्यतिरिक प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीचा मोफत प्रवास करू नका आणि दंडही भरू नका, असा सल्ला राज्य एसटी महामंडळाने दिला आहे.

प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ (१५ दिवस) या कालावधीदरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबवणार आहे. या मोहिमेत विभागातील छोट्यातील छोट्या सर्व मार्गांवर तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी तापसणीसाठी सज्ज असणार आहेत. हे सर्व अधिकारी विनातिकीट प्रवाशांविरोधात तपासणी मोहीम आणि सोबत जागृतीही करणार आहेत.

ग्रामीण भागात अधिक गरज : व्यवस्थापकीय संचालक
छोट्या छोट्या गावांतून प्रवास करणाऱ्या अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना बहुदा तिकीट न काढण्याची सवय अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गर्दीत संधी साधून तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बुडत असून अशा नागरिकांना दुप्पट दंडाच्या स्वरूपात शिक्षा मिळाली तर ते पुन्हा अशा प्रकारच्या वर्तनाला आळा घालतील. या दृष्टिकोनातून ही मोहीम सुरू करण्याचा विचार महामंडळाने केला आहे. यावर विशेष लक्ष देण्यासाठी मंडळाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या नेहमीपेक्षा वेगळे असे संभाषण कौशल्य आणि प्रशिक्षण दिले आहे. राज्यात सर्वच मार्गांवर टप्प्याटप्प्याने ही तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

  • २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीदरम्यान एसटी महामंडळ तिकीट तपासणी मोहीम राबवणार
  • सर्व मार्गांवर तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी तपासणीसाठी सज्ज असणार
बातम्या आणखी आहेत...