आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:म्हशी राखण्याच्या धसक्याने अधिकारी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले नाहीत तर अंगणात असलेल्या तीन म्हशींमध्ये आणखी दोनची वाढ होईल आणि त्यांना तुला सांभाळायला लागेल, असे वडिलांनी म्हटले. तेव्हा तो धसका घेतला आणि मी अधिकारी होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. तिथून जो प्रवास सुरू झाला तो अधिकारी होण्यापर्यंत आणि झाल्यानंतरही सुरूच आहे, अशा भावना पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी प्रकट मुलाखतीत व्यक्त केल्या. मुलाखत रेल्वेच्या मुख्य स्कॉड अनुप्रिता अंदेली यांनी घेतली. परमवीर सांस्कृतिक गणेश मंडळाच्या वतीने ही मुलाखत आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी कडुकर बोलत होत्या.

शिक्षक कुटुंबात माझा जन्म झाला. वडील परगावी नोकरीला. पंधरा-वीस दिवसांतून एकदा दोनदा यायचे. आई गृहिणी. घरात तीन म्हशी होत्या. मध्यंतरातच आईचे मणक्याचे ऑपरेशन झाले आणि मग सगळी जबाबदारी मोठी म्हणून माझ्यावर पडली. त्यावेळी शेतात असलेल्या जनावरांचे सगळे मला करावे लागायचे. तीन म्हशी होत्या. वैरण, पाणी, चारा सगळे काही मला बघावे लागायचे. त्या दरम्यान दहावीला होते. वडिलांनी तुला दहावीला ९० टक्के गुण मिळायलाच हवेत, नाही मिळाले तर घरच्या या तीन म्हशीत अजून वाढ होईल आणि तुझा प्रवास त्यांच्याबरोबर असेल, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात केली ती पुन्हा कधी थांबले नाही. कार्यक्रमासाठी मीनाक्षी कोळी, भाग्यश्री तुगावे, नम्रता तांडुरे, कविता इडे, अरुणा सामलेटी, स्मिता ताडुरे आदी महिलांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...