आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा आदेश राज्य शासनाने काढल्याने तिन जानेवारी रोजी शासकीय कार्यालयांत त्यांना अभिवादन करण्यात आले.अनेक ठिकाणी अभिवादन सोहळे साजरे करीत नतमस्तक देखिल झाले.
मात्र माढ्यातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातच या कार्यक्रमाला तिलांजली दिल्याचे बाब समोर आली आहे.स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाचा गृहपाल मुकुंद देशपांडे यांचेसह कर्मचाऱ्यांना जयंती साजरी करण्याचा विसरच पडला. हे प्रकरण दिव्य मराठीने समाजाबरोबरच व्यवस्थेच्या देखील समोर आणुन दिले आहे.
स्त्री शिक्षणाच्या क्रांती ज्योती ची अधिकार्याकडुन अवहेलना झाली आहे. या निषेधार्ह घटनेचा समाज मनातून संताप व्यक्त होत असून निषेध होतो आहे.देशपांडे यांनी सफसेल चुक देखील मान्य करीत मी पुण्याला लग्नाला गेलतो.वसतिगृहातील शिपाई व लिपीक पद ही रिक्त असल्याने जयंती साजरी करु शकलो नसल्याची कबुली देखील दिव्य मराठीच्या प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे.
त्यामुळे जयंतीपेक्षा लग्न महत्वाच होतं का ? असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.देशपांडेना व्यवस्था लावुन कर्मचार्या मार्फत देखील जयंती साजरी करता आली असते. मात्र ते देखील करण्याचे औदार्य दाखवले गेले नाही.एकीकडे नथुरामाची जंयती विरोध झुगारून साजरी होते.
स्री शिक्षणाची दारे खुली करुन महिलांना शिक्षित केलं त्या उच्च स्थानी पोहचल्या.तिच्याच पदरी मात्र उपेक्षा झालेली पहायला मिळते.या गंभीर बाबीवर आता जिल्हा प्रशासन अन् शासन स्तरावरुन संबधित अधिकार्यावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या प्रकरणावरुन ठोस कारवाई झाली तरच महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करण्याकडे कानडोळा करुन अवहेलना करणार्या शासकीय अधिकार्याना निश्चितच चाप बसेल.
मी जंयती दिवशी पुण्याला लग्नाला गेलो होतो. माझी रजा नव्हती मात्र रविवार असल्याने शासकीय सुट्टी होती. साजरी झाली नाही ही बाब खरी आहे. यापुढे अशी चुक होणार नाही. मी दक्षता घेतो.
-मुकूंद देशपांडे,गृहपाल माढा शासकीय वसतीगृह
सावित्रीबाई यांच्या मुळेच महिला स्वावलंबन जिवन जगताहेत.उच्च स्थानी महिला पोहचल्या आहेत.वसतीगृहात घडेलेला हा प्रकार लज्जा स्पद लाजिरवाणी तर आहेच शिवाय निषेधार्ह असाच आहे.संबधित अधिकार्यावर जिल्हा अधिकारी,समाज कल्याण अधिकार्यानी कडक कारवाई करावी.कारण महिलांचा हा एकप्रकारे अपमानच केला आहे.
- अॅड मीनल साठे,नगराध्यक्ष माढा नगरपंचायत
ठिक आहे मी हा विषय बघतो.या प्रकरणी मी त्यांच्याकडे विचारणा करुन सविस्तर माहिती घेतो.
- श्री.कैलास आढे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापुर
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.