आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवस्था:मनपातील जीर्ण फाइलही राहणार सुरक्षित; तीन पेठांचे स्कॅनिंग पूर्ण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील जीर्ण कागदपत्रेही आता सुरक्षित राहतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. सन २००९ पूर्वीच्या फाइल प्राथमिक टप्प्यात स्कॅनिंग करून सुरक्षित करणे सुरू आहे. आतापर्यंत शहरातील तीन पेठांच्या कागदपत्रांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे.

महापालिकेतील बांधकाम परवाना फाइल गायब झाल्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. याशिवाय अनेक फाइल जीर्ण झाल्याने हाताळताना अडचण होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आरडीके या कंपनीला स्कॅनिंगचे काम दिले आहे.

६२ पेठांचे मिळून एक लाख फाइल्स
शहरात सुमारे दोन लाखांहून अधिक मिळकती आहेत. अपार्टमेंटसाठी एकच परवाना असतो, पण त्यात मिळकतींची संख्या अधिक असते. त्यामुळे कर आकारणी विभागाकडे नोंदी असलेल्या मिळकतींपेक्षा कमी फाइल बांधकाम परवाना विभागात आहेत. सुमारे एक लाख फाइल्स असण्याची शक्यता आहे. त्यांचे स्कॅनिंग करण्यात येत आहे.

बांधकाम परवाना नकाशा स्कॅनिंग करताना.
सध्या बांधकाम परवानाच्या फाइल्सचे स्कॅनिंग करून सुरक्षित करण्यात येत आहेत. काम पूर्ण करण्यास सहा महिन्यांची मुदत आहेत. या काळात स्कॅनिंगचे काम पूर्ण होईल.''- लक्ष्मण चलवादी, सहाय्यक अभियंता, पालिका नगर रचना विभाग

बातम्या आणखी आहेत...