आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारवडे, ता. मंगळवेढा येथील सचिन तात्यासाहेब पवार (२५) यांचे विजेच्या धक्क्याने निधन झाले. उपचारासाठी पंढरपूर येथे तत्काळ हलवले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले. शेतात नवीन घराच्या बांधकामांवर पाणी मारताना पाण्याच्या दाबाने पाइप निघाल्याने तो जोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी छोटी मोटर पाण्यात पडली. यावेळी केबल पाण्यात पडल्याने छतावर विजेचा प्रवाह पसरला. विजेच्या धक्क्याने भावाची अवस्था लक्षात येताच लहान भाऊ संकेतने तत्काळ कोयत्याने केबल तोडून विद्युत प्रवाह बंद केला. पण, तोवर काळाने सचिनवर झडप घातली.
सांगोला
जयश्री महेश जरे (वय ३० रा. खवासपूर, ता. सांगोला) या गुरुवारी सायंकाळी घराच्या जवळील शेतात मोटर चालू करण्यासाठी गेल्या होत्या. त्याना विजेचा शॉक बसून जागीच गतप्राण झाल्या. त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना उपचारासाठी आटपाडी, दिघंची जि. सांगली व सांगोला येथे आणले, परंतु त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात सासू, आठ व सहा वर्षांची दोन मुले असा परिवार आहे. पती महेश बापू जरे यांचे निधन गेल्या काही वर्षापूर्वी झाले आहे.सचिन पवार , जयश्री जरे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.