आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:प्रभाकर महाराज पुण्यतिथी‎, 100‎ आचाऱ्यांनी केली प्रसादाची तयारी‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज‎ यांच्या ६६ व्या पुण्यतिथी‎ महोत्सवानिमित्त प्रभाकर महाराज‎ मंदिरात सोमवारी मंदिरात अखंड‎ नामजप सप्ताह श्री गुरुगीता‎ पारायण, सायंकाळी ६ वाजता‎ ज्ञानेश्वर वाघमारे यांचा‎ भजनसंध्या, रात्री ९ वाजता प्रकाश‎ कोथिंबीरे आणि दत्तात्रय कुसेकर‎ यांच्या मार्गदर्शनाखाली भजन पार‎ पडले. रात्री मंदिरात गुलालाचा‎ कार्यक्रम झाला. भक्तांना प्रसाद‎ देण्यासाठी विशेष म्हणजे १००‎ आचारी यासाठी गेल्या आठ‎ दिवसांपासून परिश्रम घेत आहेत.‎ उद्या ७ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद‎ वाटप करण्यात येणार आहे.‎

१०० आचारी लोकांनी आठ दिवसांत‎ या महाप्रसादाची दीड लाख पाकिटे‎ तयार केली आहेत. मंदिराला सोनेरी‎ रंगाची विद्युत रोषणाई करण्यात‎ आली आहे. ५ फेब्रुवारीपासून‎ विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत‎ आहेत. रविवारी श्री प्रभाकर‎ अनुसंधान या पोथीचे सामूहिक‎ अनुष्ठान झाले. बुधवार, दि. ८ रोजी‎ रथ मिरवणूक निघणार आहे.‎ दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी‎ महाप्रसाद वाटप म्हणजे बुंदी लाडू‎ महाप्रसाद म्हणून दिले जातात. ही‎ परंपरा मंदिर उभाारणीपासून सुरू‎ आहे. महाप्रसादाची तयारी गेल्या‎ महिनाभरापासून केली जात आहे.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मंदिर समितीने महाप्रसाद तयार‎ करून याचे पॅकेट तयार करण्याची‎ जबाबदारी गुरुप्रसाद फुलारे यांना‎ दिली आहे.‎ महाप्रसादाची तयारी करताना.‎ मंगळवारपर्यंत‎ महाप्रसादाचे आयोजन‎ पुण्यतिथीनिमित्त ५ ते ७‎ फेब्रुवारीपर्यंत दुपारी महाप्रसादाचे‎ आयोजन केले आहे. बुधवारी रात्री‎ साडेदहा वाजता महाप्रसाद वाटप‎ होणार आहे. दररोज सुमारे एक‎ हजार भक्तगण याचा लाभ घेत‎ आहेत, अशी माहिती मंदिर ट्रस्टी‎ उदय वैद्य यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...