आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:धूमसत असलेल्या भोगाव कचरा डेपोची 9 व्या दिवशी पालकमंत्र्यांकडून पाहणी; गरज पडल्यास सरकारी मदतीचे सोलापूर

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या भोगाव येथील कचरा डेपोस शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली. सुमारे ४० एकर परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून आग धुमसत आहे. मात्र पालकमंत्र्यांना आता सवड मिळाली. ४ मेपासून धग व धुराचा परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे.

भेटीवेळी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोबत होते. पालकमंत्र्यांनी बायोएनर्जी कंपनीच्या इमरतीवरील तिसऱ्या मजल्यावरून डेपोची पाहणी केली. कचरा वर्गीकरण मक्त्याचा प्रस्ताव मंजूर करू : डेपोतील कचरा वर्गीकरणाचा मक्ता देण्याचा प्रस्ताव आला आहे. नगरविकास खात्याची लवकर मान्यता घेऊन तो मंजूर करू, असे पालकमंत्री भरणे म्हणाले. या वेळी उपायुक्त मच्छिंद्र घोलप, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, राष्ट्रवादीचे संतोष पवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...