आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, ओक्के मदी हाय...! सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील अशा वक्तव्याने सोशल मीडियावर महाराष्ट्रासह देशात खळबळ माजवून टाकली. माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यातील या संवादाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
हा संवाद गुवाहाटी येथे असलेल्या एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांना आवडल्याने त्यांनी पुन्हा आमदार शहाजी पाटील यांना म्हणायला लावला. एका आमदाराच्या अस्सल मराठी भाषेतील व्हिडीओ क्लिपमुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. ज्यानी कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फतकल मारून बसून बुक्कीनी कांदा फोडून शेंगदाण्याच्या चटणीबरोबर भाकर तुकडा मोडलेला नाही. चामड्याच्या कर्रकर्र करणाऱ्या जड चपला असूनही चिखलातून चालत गेले नाही.
आनवाणी पायानी कधी शेतात वावरले नाही, त्यानी शहाजी बापूंच्या वास्तवाची काय जाण असेल अशा शब्दात अनेकानी सोशल मिडियावर आमदार पाटलांचे समर्थन केले आहे. त्यांच्या संवादावर ‘शहाजीबापू... दिल जीत लिया आपने...! असे तयार केलेले गाणेही सोशल मीडिवार चाहत्यांच्या मनावर गारूड केले आहे. काहींनी टी-शर्ट वर हा संवाद छापून ते परिधानही केल्याचे दिसत आहे. सांगोला तालुक्यातील चाहते शहाजीबापू ज्या पक्षात जातील तो आमचा पक्ष असे सांगताहेत. आमदार पाटलांच्या कार्यालयाला आणि चिक-महूद येथील घराला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.