आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशाेत्सव:विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी दीड हजार सार्वजनिक मंडळे सज्ज, उद्या आगमन

साेलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाडक्या गणरायाच्या स्वागताची उत्सुकता आता शिगेला पाेहाेचली. सुमारे दीड हजार सार्वजनिक उत्सव मंडळांनी यंदा जाेरदार तयारी केली. प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकांसाठी लेझीमचा सराव सुरू झाला. बुधवारी विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी ही मंडळी वाद्यवृंदांसह रस्त्यावर येतील.

दुसरीकडे पाेलिस यंत्रणा सजग झाली आहे. कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, भक्त आणि सामान्यांना कुठलाही त्रास हाेणार नाही, वाहतुकीत व्यत्यय येणार नाही, याच्या उपाययाेजना पूर्ण झाल्या आहेत. मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचनाही दिली आहे. गर्दीत दागिने घालून जाण्याचे टाळा, महागडे माेबाइलदेखील गर्दीत वापरू नका, असे नागरिकांना आवाहन केले आहे.

खरेदीला आले उधाण
मधला मारुती, टिळक चाैक, बाळीवेस या परिसरात गणपतीसह गाैरीच्या स्वागताची खरेदी असते. ग्रामीण आणि शहरी ग्राहक या मध्यवर्ती बाजारपेठेत येताे. त्याने वाहतुकीची काेंडी हाेते. त्यामुळे पाेलिसांनी या संपूर्ण परिसरात वाहतुकीचे नियाेजन केले आहे. काेंतम चाैक ते बाळीवेस मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत.

पोलिसांनी तीनशे परवाने दिले
काेराेना प्रतिबंधक निर्बंध असल्याने गेली दाेन वर्षे मर्यादित स्वरूपात गणेशाेत्सव झाला. यंदा निर्बंधमुक्त वातावरणाने भक्तांचा उत्साह वाढला. शहरातील सातही मध्यवर्ती महामंडळांमार्फत सुमारे दीड हजार सार्वजनिक उत्सव मंडळांमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना हाेईल. त्यासाठी पाेलिस आयुक्तालयाने साेमवारपर्यंत तीनशेहून अधिक मंडळांना परवाने दिली आहेत. त्याची प्रकिया मंगळवारपर्यंत चालणार आहे.

घरगुती दर देऊ केले तरी एकाही मंडळाकडून विजेसाठी अर्ज नाही मंडळांकडून बेकायदा असुरक्षित वीजजोडणी झाल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. घरगुती दर देऊ केले तरी सध्या एकाही मंडळाने वीजजोडणीसाठी अर्ज केलेला नाही. शहरात दरवर्षी ५० ते ६० गणेश मंडळ महावितरणकडून वीज जोडणी करून घेतात. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणी करून घेऊन होणारे अपघात टाळावे आणि महावितरणला सहकार्य करावे. गणेश मंडळांनी जर अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...