आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा विशेष!:भगवा घेऊन दुर्गा माता दौंड मध्ये धावली दीड हजार तरुणाई

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्रभागी मानाचा भगवा ध्वज.... त्यामागे मानाचे शस्त्र पथक... आणि त्यामागे भगवे फेटे परिधान केलेले तब्बल दीड हजार युवक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्री दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात सहभागी झाले. नवरात्रीनिमित्त घटस्थापनेपासून शहरातून विविध भागांतून दररोज निघालेल्या श्री दुर्गामाता दौंडीचा समारोप बुधवारी विजयादशमीनिमित्त झाला.

प्रारंभी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे झाले. यानंतर श्री दुर्गामाता दौडीस प्रारंभ झाला.

देशासाठी जगायचं रं शिवबांना सांगावा धाडलाय रं, भारत हिंदुस्थान है हिंदूओंकी शान है, जय भवानी जय शिवराय आदी गीते, श्लोक म्हणत श्री दुर्गामाता दौड निघाली. वाटेत हिंदू बांधवांनी श्री दुर्गामाता दौडीचे रांगोळीच्या पायघड्या घालून, पुष्पवृष्टी करत स्वागत केले. दीड हजार युवक एकाच वेळी रस्त्यावर चालत असूनही यावेळी असलेल्या शिस्तीचे नागरिकांनी कौतुक केले.

पत्रा तालीम, कैकाडी गल्ली, श्री मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, श्री कसबा गणपती, टिळक चौक, मधला मारुती, सराफ बाजार, बलिदान चौक, श्री शिवगंगा मंदिर, शाहीर वस्ती, मंत्री चंडक मार्गे श्री दुर्गामाता दौड श्री रूपाभवानी मंदिरात पोहोचली. या ठिकाणी आरती आणि ध्येयमंत्राने श्री दुर्गामाता दौडीचा समारोप झाला.

तरुणाई जपतेय मनापासून परंपरा

दरवर्षी या उपक्रमात नवनवीन तरुण-तरुणी जोडले जातात मात्र कोरोना नंतर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले असून यात दहावी वैद्यकीय विद्यार्थी आणि इंजिनियर वेगवेगळ्या शाखेचे अभियंता ही सहभागी होत आहेत त्यामुळे शिक्षण कितीही झाले तरी तरुणाईला मनापासून परंपरा जपण्याचा छंद लागला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. असे चित्र पाहायला मिळत आहे.

अनेक मंदिरात आरास

हिंगुलांबीका मंदिर, यल्लमा मंदिर, रुपाभवानी मंदिर,गायत्री मंदिर लक्ष्मी मंदिर, चौडेश्वरी मंदिर आणि गावठाणत असणाऱ्या छोट्या छोट्या मंदिरांमध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केले होते. देवीला कुंकू मार्चला कडून प्रसाद घेणे आणि नारळ वाहने अशा धार्मिक विधींनी महिलांनी दर्शन घेऊन दसऱ्याचा दिवस सारखे लावला. यावेळी अनेक मंदिरांमध्ये देवीला शालू ने व वेगवेगळ्या वस्त्रांनी हारांनी अलंकारांनी सजविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...