आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माध्यमाचा अवलंब करावा:मराठी माध्यमातूनही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते; युनिक अकॅडमीचे डॉ. शिरापूरकर यांचे प्रतिपादन

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्रजी भाषेचा न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाचा अवलंब करावा, मराठी माध्यमातूनही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होता येते. मराठी माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांत यशस्वी होत आहेत,” असे प्रतिपादन युनिक अकॅडमी, पुणे येथील संचालक डॉ.महेश शिरापूरकर यांनी केले.

वालचंद कॉलेज ऑफ आर्ट््स अँड सायन्स आणि हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीने आयोजित “ स्पर्धा परीक्षांचे स्वरूप व तयारी’ या विषयावरील विशेष व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सत्यजित शहा उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य डॉ. मनोहर जोशी, समन्वयक डॉ. संगमेश्वर नीला, डॉ. नवराज काळदाते उपस्थित होते.व्याख्यानानंतर डॉ. शिरापूरकर यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूत्रसंचालन प्रा.नानासाहेब गव्हाणे यांनी केले. डॉ. महावीर शास्त्री, डॉ.सिद्राम सलवदे, डॉ.नागनाथ धायगोडे, धनंजय जिडगीकर, अभिजित जाधव, डॉ.भागवत गजधाने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...