आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकीत मिळकत करापोटी तीन शिक्षण संस्था सील:एक कोटी 21 लाख 35 हजार 863 रु. केले वसूल

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका कर संकलन विभागाने थकीत करवसुली माेहीम सुरू करत गुरुवारी तीन शिक्षण संस्था सील केल्या. यात केगाव येथील सिंहगड काॅलेज, बाळे येथील श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळाचे कार्यालय आणि भारतरत्न इंदिरा गांधी इंजिनिअरिंग काॅलेज सील करण्यात आले. याशिवाय १२ थकबाकीदाराकडून १.२१ कोटी रुपये वसुली करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.

कर वसुलीसाठी महापालिकेने पाच पथक तयार केले आहेत. त्यांच्याकडून कारवाई सुरू आहे. याशिवाय एक विशेष पथक आहेे. पाच जणांच्या पथकांनी गुरुवारी ५४ लाख रुपयांची वसुली केली. विशेष पथकाने शिक्षण संस्था आणि इतरांकडून मिळून १ कोटी २१ लाख ३५ हजार ८६३ रुपये वसूल केले.

सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्टकडून ४५ लाख, भोगल्या स्वामी, जवळेकर, ओम डेव्हलपर्स ११.३७, यशोधरा हाॅस्पिटल २०.२८, भद्रावती यंत्रमाग संस्था ३.८९, सत्य विजय मंगल कायार्लय ९.३५, बी. एस. कामानी ४.५३, आर. डी. सारडा ४.४३, डी. एस. जाधव २.२९, पुलगम टेक्स्टाइल १.१२, मागल्या स्वामी ११.८९, महाराष्ट्र सॉ मील ३.१३, कृ़ष्णा स्टोन ४.२ लाख असे एकूण १.२१ कोटी वसूल झाले. ही कारवाई कर विभागाने केली.

बातम्या आणखी आहेत...