आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सावकारी कायद्यात सुधारणांनंतरही शेतकऱ्यांच्या एक लाख एकर जमिनी गेल्या सावकारांच्या घशात

श्रीनिवास दासरी | सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जमिनी सावकाराच्या ताब्यात गेल्या कशा? काय म्हणतात तज्ञ...

सावकारी सुधारित कायदा २०१४ लागू झाल्यानंतरही राज्यभरातील शेतकऱ्यांच्या सुमारे एक लाख एकर जमिनी सावकारांच्या घशात गेल्या असून सुधारित कायद्यातील त्रुटी व नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सावकारी प्रकरणांची छाननी करून त्यातील त्रुटी, दोष शोधणार आहे.

अवैध सावकारी रोखणे, तारण जमिनी परत मिळवून देणे या बाबी सुकर करण्यासाठी सावकारी कायद्यात आमूलाग्र बदल करण्यात आले. तज्ज्ञांच्या शिफारशी स्वीकारून तत्कालीन भाजपप्रणीत शासनाने २०१४ मध्ये सुधारित कायदा लागू केला. मात्र सुधारित कायद्यातही त्रुटी असल्याचे आढळून आल्याने गतवर्षी डिसेंबरमध्ये आघाडी सरकारने आढावा घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची एक लाख एकर जमिनी सावकारांच्या घशात गेल्याची माहिती तत्कालीन सहकारमंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी नागपूरच्या अधिवेशनात याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी सरकारने एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते त्यानुसार १९ नोव्हेंबर २०२० रोजी ही समिती गठित झाली.

अशी आहे नवीन समिती

आमदार विद्या चव्हाण (अध्यक्ष), अंबादास दानवे, माजी आमदार ख्वाजा बेग, रामहरी रूपनवर, डाॅ. आशा मिरगे, घनश्याम धरणे, अॅड. गजानन बोचे, शंतनू पाटील, रमेश चव्हाण (महसूल सहसचिव), किशोर भालेराव (गृहविभाग उपसचिव), सहकार आयुक्त पुणे, सावकारी उपनिबंधक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

जमिनी सावकाराच्या ताब्यात गेल्या कशा? काय म्हणतात तज्ञ...

सुधारित सावकारी कायद्यानुसार सहकार खात्याच्या जिल्हा उपनिबंधकांना दिवाणी न्यायाधीशांचे अधिकार देण्यात आले. जमीन तारण ठेवल्यानंतर १५ वर्षांच्या कालावधीतच दावा करता येतो. त्याचा पुरावा देण्यात काही तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश निकाल सावकारांच्या बाजूने लागतात. निकालांविरोधात विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्याची तरतूद आहे. या प्रक्रियेत सामान्य शेतकरी टिकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या घशात गेल्याची निरीक्षणे आहेत. - अॅड. विनायक नागणे, कायदेतज्ञ, मंगळवेढा

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser