आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविजापूर नाका ते हत्तूरपर्यंत चौपदरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. सोलापूरहून हत्तुरकडे जाणाऱ्या रस्त्याची एक बाजू झाली आहे. झालेला रस्ता एक वर्षातच उखडत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना अचानक आलेल्या पावसाचे कारण प्रशासन पुढे करत आहे.
केगाव ते हत्तूर या बायबास रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. संभाजी तलाव ते हत्तुरपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम हा विभाग करत आहे. विजापूर नाका ते हत्तूर या साडेतीन किमीपर्यंत चौपदरीकरण होत आहे. या कामाचा मक्ता अवताडे कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला असून १५ कोटी रुपये खर्च येणार आहे. काम करण्यास मक्तेदारास अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याचा दोष दायित्व कालावधी तीन वर्षांचा आहे. या कामाला सुरुवात होऊन एक वर्ष उलटले आहे.
काम करवून घेणार
काम सुरू करण्यात आले त्यावेळी अचानक पाऊस आला. त्यामुळे सध्या काही ठिकाणी रस्ता उखडल्याचे दिसत आहे. मक्तेदाराकडून तो चांगल्या दर्जाचे काम करून घेणार आहोत. लवकरच हे काम होईल.’’ -एस. डी. गायकवाड, उपअभियंता
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.