आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारभाव:कांद्याच्या दरात 50% घसरण,प्रतिक्विंटल 1800 रुपयांवर

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिरवी मिरचीच्या दरात वाढ, भाजीपाल्यांचे दर स्थिर

कांद्याच्या विक्रमी आवक असतानाही दर स्थिर होते. पण मागील आठवडाभरात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. प्रतिक्विंटल कांदा १८०० रुपयांवर पोहोचला आहे तर सर्वसाधारण ९५० रुपयांवर आले आहेत. मागच्या महिन्याच्या तुलनेत दरात सुमारे ५० टक्के घट झाली आहे.

हिरवी मिरचीच्या दरात वाढ झाली असून, भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. उन्हाळी फळे खरबूजचे दर तेजीत आहेत. तर कलिंगडचे दर स्थिर आहेत. कारली १ ते ३ हजार, वांगी ५०० ते २ हजार, कोबी ४०० ते ५००, ढोबळी मिरची ३ हजार, गाजर ७०० ते २२००, चिकू ८०० ते २ हजार, गवार २ ते ७ हजार, कोथिंबीर २०० ते ६००, काकडी ४०० ते २७५०, टोमॅटो २०० ते ८००, बटाटा ७५० ते १५००, घेवडा २ हजार, द्राक्षे ६० ते २००, शेपू ३०० ते ६००, पालक २०० ते ३५०, खरबूज १ हजार ते ४५००, कलिंगड १ हजार ते २५०० असा दर आहे. डाळिंब १ हजार ते १० हजार ५००, दोका ५०० ते ४ हजार, तूर ५८००, हरभरा ४३२५ ते ४५६०, गहू २३३० ते ३१२५ असा दर मिळत आहे.

गवार ७० तर भेंडी ४५ रुपये किलो
गवार व भेंडीचे दर अधिक तेजीत आहेत. भेंडी २ ते ४५०० तर गवार २ ते ७ हजार रुपये क्विंटल आहे. किरकोळ बाजारात भेंडी ६० रुपये तर गवार ८० रूपये किलोने विक्री होत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी फळांचेही दरात घसरण पाहण्यास मिळाली. डाळिंब, कलिंगड, सफरचंद दरात घट झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...