आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओन्ली वन अर्थ कार्यक्रम:समृद्ध पर्यावरणावर मानवजातीचे भविष्य अवलंबून; प्रा.के. एम. जमादार यांनी व्यक्त केले मत

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती लोकसंख्या, तिच्या गरजा भागविण्यासाठी वाढत चाललेले औद्योगीकरण, सिमेंट काँक्रिटच्या जंगलाची निर्मिती, स्वयंचलित वाहनातून सोडले जाणारे घातक प्रदूषके, ध्वनि प्रदूषण, वृक्षतोड, विकासाच्या नावाखाली चालू असलेले पर्यावरणाचे शोषण, यामुळे तापमान वाढत आहे. त्यामुळे सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. हा धोका टाळण्यासाठी व येणाऱ्या पिढ्यांना उज्वल भविष्य प्राप्त होण्यासाठी समृद्ध पर्यावरण निर्माण करणे आवश्यक असून त्यावरच मानवजातीचे भविष्य अवलंबून आहे असे प्रतिपादन प्राचार्य के. एम. जमादार यांनी केले.

ते व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित "ओन्ली वन अर्थ" या विषयावरील जनजागृती कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंगचे मार्गदर्शक डॉ. श्रीकांत येळेगावकर हे होते.

या वेळी व्यासपीठावर दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, शिवदारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. कांबळे, बापूसाहेब खीलजे, फॅमिली प्लॅनिंगचे खजिनदार डॉ. एन.बी. तेली, सुगतरत्न गायकवाड, प्रा. संगीता बावगे, प्रा. वसंत माणुरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. प्राचार्य डॉ. बी. एन. कांबळे यांना महाराष्ट्र शासनाचा एन. एस. एस. विभागातील सन 2016-17 चा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार मिळाल्याबद्दल फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्यावतीने गौरव पत्र, शाल व बुके देऊन राजशेखर शिवदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. संगीता बावगे यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. वसंत मणूरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...