आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील डाॅ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाने शहरातील निवडक शाळांतील मुलांची उंची आणि वजन तपासणी केली. यातून शालेय मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या अगदीच नगण्य असल्याची सकारात्मक बाब पुढे आली. तपासणी केलेल्या १०९० विद्यार्थ्यांमध्ये केवळ १८ विद्यार्थी लठ्ठ आढळले. मुलांमधील स्थूलपणाचे राज्यातील सरासरी प्रमाण ३.७८ टक्के असताना सोलापुरातील मुलांत हेच प्रमाण केवळ १.६५ टक्के दिसून आले आहे. याचे संपूर्ण श्रेय सोलापुरातील शाळा जागरुकता, शिस्त आणि पालकांची मिळणारी साथ याला जाते.
शहरातील बहुतेक शाळांत जंक फूड आणण्यास मनाई आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाने शालेय मुलांची उंची, वजन तपासणी मोहीम राबवली जात आहे. मुलांमधील लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयांकडून एकच दिवशी या मोहिमेची सुरुवात झाली.
त्यानुसार सोलापूर शहरातील मनपा कॅम्प शाळा, सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, मनपा उर्दू शाळा कॅम्प, मॉडर्न हायस्कूल आणि सिद्धेश्वर प्रशाला या पाच (तीन सरकारी आणि दोन खासगी) शाळांची निवड केली होती. यात सातवी ते नववीच्या एकूण ७४७ मुले व ३४३ मुलींची उंची व वजन यांचे गुणोत्तर काढले. १६ गटांतून ६४ डॉक्टरांनी या तपासणी केली. राज्यात एकूण १४ हजार २७८ मुलांची तपासणी केली असता ५४० मुले लठ्ठ आढळली.
शाळेतून आणली जाते जागरूकता
मुलांनी डब्यात पोळी, भाजी आणली पाहिजे यावर वर्ग शिक्षकांमार्फत लक्ष देण्यात येते. वर्षातून दोन ते तीन कार्यशाळा घेण्यात येतात. भरड धान्याची माहिती दिली जाते. बाजरी दिनी सर्व विद्यार्थ्यांच्या डब्यांत बाजरीचे पदार्थ होते. आता नाचणी दिन आहे. दरमहा एक धान्य दिन असतो. जंक फूडला मनाई आणि पोळी, भाजी, भाकरीला प्राधान्य आहे. शिक्षण समिती सदस्य डाॅ. राजशेखर येळीकर यांचे मार्गदर्शन असते ''- एस. बी. पाटील, प्राचार्य, श्री सिद्धेश्वर प्रशाला
लठ्ठपणाची आहेत ही कारणे
जंक फूड, वारंवार खाणे, जास्त खाणे, गोड खाणे, व्यायामाचा अभाव आणि काही आजार.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.