आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य केंद्र वाऱ्यावर:गौडगावात डॉक्टरांची केवळ तीनच दिवस व्हीजिटिंग सेवा ; कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळावी

गौडगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौडगाव, ता. बार्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सोयीसुविधांचा अभाव आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगाव आणि उपकेंद्र गौडगाव या ठिकाणी आरोग्य सेविकांची नियुक्ती नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पूजा थिटे या मुख्यालयात राहत नसून आठवड्यातून केवळ तीन दिवस सकाळी दहा ते साडेबारा याच वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. त्याच रहात नसल्याने इतर आरोग्य कर्मचारीही मुख्यालयात राहत नाहीत. सोमवारी गौडगाव येथे आठवडा बाजार होता. सकाळी ११ पर्यंत उपकेंद्र गौडगाव आणि प्राथमिक आरोग्य केंद्र गौडगावात आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांना त्रास झाल्याची तक्रार गौडगाव ग्रामस्थ करीत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १९ गावांचा समावेश आहे. केवळ तीन आरोग्यसेविका कार्यरत आहेत.जिल्ह्यातील गौडगाव एकमेव आरोग्य केंद्र आहे ज्या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती आहे. डॉ. मधुरा डोले आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा थेटे या मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.

वागणूक चांगली हवी शनिवारी माझ्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेलो होतो. डॉक्टर नव्हत्या. प्रशिक्षणार्थी डॉक्टरने कोणतीही तपासणी न करता गोळ्या लिहून दिल्या. सोमवारी सकाळी पुन्हा गेलो असता अकरावाजेपर्यंत सिस्टर आल्या नव्हत्या. आम्हाला योग्य उपचार आणि चांगली वागणूक मिळावी. केंद्रातील उर्मट कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी. केंद्रात ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांना चांगले उपचारही मिळायला हवेत. सुधीर दसवंत, नागरिक

मनुष्यबळ कमी आहे. साडेबारा वाजेपर्यंत मी ओपीडीला होते. मी गावाकडे आले आहे. शनिवारचा प्रकार समजला.आरोग्यसेविकेला नोटीस काढली.स्टाफ कमी असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे नियोजन करता येत नाही. कर्मचाऱ्यांना बोलण्याविषयी सांगितले पण ते ऐकत नाहीत. एस. जे. जाधवर याच फक्त मुख्यालय राहतात. आमच्याकडे मनुष्य बळ कमी आहे. रिक्त पदांची भरती करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. डॉ. पूजा थिटे, वैद्यकीय अधिकारी

प्रसंगी कारवाई करणार गौडगाव आरोग्य केंद्र बाबतच्या तक्रारी प्राप्त झाले आहेत. दोषींवर कारवाई करण्यात येईल. संबंधित आरोग्यसेविकेला नोटीस काढली आहे. या संदर्भात आरोग्य केंद्रांतर्गत बैठक बोलावून नियोजन करण्यात येईल. कर्मचाऱ्यावरती अंकुश ठेवण्याचे काम वैद्यकीय अधिकाऱ्याचे आहे. त्यांना समज देण्यात येईल. त्यानंतर वेळ पडली तर कडक कारवाई करण्यात येईल. डॉ. अशोक ढग, तालुका वैद्यकीय अधिकारी, बार्शी

बातम्या आणखी आहेत...