आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतर:समांतर जलवाहिनीसाठी दोनच मक्तेदार ; मंगळवारी कंपनीच्या संचालकांची बैठक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी ते सोलापूर १७० एमएलडी समांतर जलवाहिनीच्या कामासाठी स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनीने ६८१ कोटींचे टेंडर काढले आहे. ते काम घेण्यासाठी दोनच मक्तेदार आले आहेत. इच्छुक १४ कंपन्या होत्या. त्यामुळे टेंडर ओपन करण्याबाबत सोमवारी कंपनीचे चेअरमन असिम गुप्ता निर्णय घेणार आहेत. मंगळवारी कंपनीच्या संचालकांची बैठक बोलवली आहे. त्यात समांतर जलवाहिनीसह महापालिका आवारात बांधण्यात येत असलेल्या कमांड अॅण्ड कंट्रोल रुमबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. समांतर जलवाहिनीची फेरटेंडर प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी १५ जण इच्छुक होते तर १४ जणांनी जागेची पाहणी करून फोटो पाठवले. त्यापैकी २ जणांनी टेंडर भरले आहे. ते खुले केल्यानंतर ते पात्र आहेत का? यांची माहिती मिळेल. टेंडर खुले करावे की पुन्हा टेंडर काढावे याबाबत सोमवारी कंपनीचे चेअरमन गुप्ता निर्णय घेणार आहेत. मंगळवारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक समांतर जलवाहिनीच्या टेंडर प्रक्रियेवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी काढले होते पण टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने त्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...