आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरीतर्फे व्याख्यानमाला:संधी जवळच, लक्षपूर्वक ती शोधा, यश निश्चित; बाळासाहेब मस्के यांचे प्रतिपादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास महत्त्वाचा आहे. नवीन संकल्पना मांडून त्यादृष्टीने वाटचाल करण्याची धमक पाहिजे. तुम्हाला जे व्हायचे आहे, त्यासाठी तुम्ही सुरू केलेल्या परिश्रमात सातत्य पाहिजे. संधी तर तुमच्या जवळच आहे. फक्त लक्षपूर्वक शोधा. यश निश्चित सापडेल, असे विचार वक्ते बाळासाहेब मस्के, बीड यांनी मांडले.उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ व रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात बुधवारी सायंकाळी गणेशोत्सव निमित्त आयोजित बौद्धिक व्याख्यानमालेत श्री. मस्के बोलत होते.

‘तरुणाईच्या वेगळ्या वाटा’ या विषयावर त्यांनी सातवे पुष्प गुंफले. व्यासपीठावर यल्लादास लचमापुरे, रोटरी क्लबच्या अध्यक्षा लता चन्ना, सचिव अंबादास गड्डम आदी उपस्थित होते. रोटरीचे बुचय्या गुंडेटी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. कवयित्री रेणुका बुधाराम यांनी सूत्रसंचालन तर नरहरी कौकुंटला यांनी आभार मानले. या वेळी गणेश इराबत्ती, श्रीनिवास ईट्टम, चार्वाक बुर्गुल, रमेश कमटम आदी उपस्थित होते.

काहीतरी करण्याची धमक असल्यास १०० टक्के यशाच्या शिखरावर
श्री. मस्के म्हणाले, प्रत्येक वळणावर वाटा आहेत. योग्य वाट आणि दिशा शोधण्यासाठी आपण सावध असणे गरजेचे आहे. आजकालच्या युवकांना मनोरंजनाची सवय लागली आहे. मनोरंजन शोधण्यासाठी तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे त्यांची दिशा भटकत आहे. त्यांचा मार्ग चुकतोय. यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज नाहीये. आज असे अनेक उद्योगपती आहेत, ज्यांचे शिक्षण शून्य आहे. काहीतरी करण्याची धमक आपल्यात असल्यास आपण शंभर टक्के यशाच्या शिखरावर पोहोचू.

बातम्या आणखी आहेत...