आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना महामारीमुळे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी मिळाली नाही, तरी ती संधी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून मिळत आहे, असे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. त्या 18 व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बोलत होत्या.
मुलांच्या कलागुणांना वाव
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मुलांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता असते. त्याचबरोबर ऑफबीट गुणवत्ता, त्याचे टॅलेंट दाखवण्यासाठी ह्या स्पर्धा उपयुक्त ठरतात. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. हाच आत्मविश्वास भविष्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये करिअर करताना उपयुक्त ठरतो.
भेट वस्तू देण्यापेक्षा अनुभव द्या
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मुला मुलींच्या वाढदिवसाला भेट वस्तू देण्यापेक्षा अनुभव द्या. याचा उपयोग मुला-मुलींनाच होणार आहे. हाच अनुभव त्यांच्यामध्ये चिरकाल राहील. त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळेल. त्याचबरोबर शासनाकडून कला व क्रीडा या क्षेत्राकडे कमी प्रमाणात लक्ष दिले जाते होते. मात्र भविष्यात जास्तीत जास्त निधी या विभागाला कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहे.
अंतिम फेरी सुरू
हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्य संचालनालयतर्फे आयोजित 18 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अंतिम फेरी सुरुवात करण्यात आली. यावेळी कलावंत राजा बागवान, नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे, महानगर शाखा अध्यक्ष अजय दासरी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार ममता बोल्ली यांनी केले. याप्रसंगी परीक्षक पी.डी. कुलकर्णी, शुभांगी पाठक, ज्ञानेश्वर गायकवाड, संजय हळदीकर, सुरेंद्र वानखेडे, कार्यक्रम अधिकारी मच्छिंद्र पाटील उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.