आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत कबीर महाराज मठात बैठक:पंढरपूर कॉरिडॉरला वारकऱ्यांचा विरोध ; एकमताने ठराव मंजूर

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारच्या प्रस्तावित कॉरिडोअरला वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी विरोध केला आहे. वारकरी संप्रदायातील काही फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांची शनिवारी संत कबीर महाराज मठात बैठक झाली. या वेळी राज्य शासनाच्या पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित काॅरिडाॅरला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

वारकरी संप्रदायाचा कुठेही विकासाला विरोध नाही. मात्र पंढरपूरचा विकास आराखडा राबवत असताना वारकरी संप्रदायाला विचारात घेणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाला विश्वासात घेऊनच आराखडा तयार केला पाहिजे, अशी मागणी यावेळी हभप नामदास महाराज यांनी केली. वारकऱ्यांना विश्वासात न घेता कॉरिडॉर आणला आहे, विकास कामाला आमचा विरोध नसल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...