आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:तीन फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी विरोध, शहरातील मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला विरोध

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती विसर्जन करण्यास महापालिकेने विरोध केला आहे. त्या मूर्तींचे शहराजवळील हिप्परगाा येथील दगड खाणीत विसर्जन करावे, अशी भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेला मध्यवर्ती मंडळांनी विरोध केला आहे. याशिवाय आमदार प्रणिती शिंदे यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्र लिहून तीन फुटांच्या मूर्तींचे विसर्जन प्रथेप्रमाणे करू द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने पुन्हा विचार करावा, अशी मागणी मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

गणेश विसर्जनाचा मुद्दा ऐरवणीवर आला असून, हिप्परगा येथील दगड खाणीत विसर्जन करण्यासाठी येणारा वाहतूक खर्च आणि गैरसोय लक्षात घेता यास पालिका आयुक्तांच्या भूमिकेला विरोध होत आहे. दुसरीकडे विसर्जनासाठी महानगरपालिका, पोलिस प्रशासन जोरदार तयारी करत आहेत. मोठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

विसर्जनासाठी हजार पालिका कर्मचारी गणेश विसर्जनसाठी महापालिका सुमारे हजार कर्मचारी नियुक्त करणार आहे. यात महापालिकेचे ६०० आणि कंत्राटी पद्धतीचे ४०० कर्मचारी असतील. प्रत्येक विसर्जन ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र असणार आहे. त्यासाठी घंटागाडीसह खासगी वाहने पालिका घेणार आहे.

पोलिसांबरोबर चर्चा करणार आहोत पालिका आयुक्तांबरोबर चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ. वाहतुकीचे नियोजन पोलिस करत आहेत. हिप्परगा येथील खाणीत दाेन क्रेन ठेवण्यात येणार आहेत. - पी. शिवशंकर, पालिका आयुक्त

ठरलेल्या ठिकाणी परवानगी द्या महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे विसर्जन करण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी द्यावी. गणेश विसर्जनासाठी आवश्यक असलेल्या सर्व सोयी मनपाने कराव्यात. सुरक्षा रक्षक नेमावे आदी मागण्यांचे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे. - प्रणिती शिंदे, आमदार मनपा, पोलिसांकडून विसर्जनाची जय्यत तयारी

बातम्या आणखी आहेत...