आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजैन समाजाचे श्रध्दास्थान असलेला सम्मेद शिखरजीस झारखंड सरकारने पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केल्यास त्यास सकल जैन समाजाच्या वतीने विरोध सुरु केला. कारण पर्यटनस्थळामुळे तेथे मांसाहार, मद्यपानसह इतर अधार्मिक कार्यक्रम होतील.
पर्यटन स्थळास विरोध करण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी दुकाने बंद ठेवण्यात आले. तसेच महावीर सांस्क्रतिक भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला. यात सुमारे विविध असे 45 संघटना व समाज बांधव मिळून तीन हजार जैन समाजबांधव उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होते.
अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ करण्यास विरोध दर्शविणारा निवेदन देण्यात आले. संम्मेद शिखरजी पर्यटन स्थळ करण्यासाठी देशातील जैन समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. बुधवारी जैन समाजाने दुकाने बंद ठेवले, देशात विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आले.
यासाठी जैन मुनी यांनी आपल्या तत्वानुसार शांततेने मुक मोर्चा काढण्याचे आवाहन केले होते. बुधवारी सोलापुरात जैन समाजाने दुकाने बंद ठेवले. दुपारी अडीच वाजता महावीर सांस्कृतिक भवन येथे शहरातील सकल जैन समाज एकत्र येत मुक मोर्चा काढला. शिखरजीच्या पर्यटन स्थळास विरोध दर्शवणारे फलक मोर्चात झळकावले. शहरातील विविध मंदीराचे विश्वस्थ, समाजातील प्रतिष्ठीत व्यक्ती, विविध 46 संस्था, संघटना, मंडळ सहभागी झाले हाेते.
महावीर सांस्कृतिक भवन येथून मोर्चास सुरुवात झाला, माणिक चौक, दत्त चौक, लक्ष्मी मार्केट, पंचकट्टा ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूनम गेट येथे मोर्चाचे रुपातर सभेत झाले. तेथे महावीर शास्त्रीसह समाज बांधवानी आपल्या भवाना व्यक्त करत सम्मेद शिखरजी पर्यटन स्थळास विरोध दर्शवत त्यांचे कारणे स्पष्ट केले. यावेळी अरविंद दोशी, महावीर शास्त्री, अनिल जमगे, महिर गांधी, हर्षल कोठारी, सुनील गांधी, इद्रमल जैन, कनुमल शहा, पराग शहा, राजेंद्र कासवा, पदम राका, कल्पेश मालू, मनिष शहा, सागर शहा यांच्यासह सकल जैन समाज बांधव उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
12 तासाच्या आत तीन हजार समुदाय
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पोलिसांनी कडून मोर्चाची परवानगी मिळाल्यानंतर मोर्चाचे नियोजन करण्यात आले. महावीर सांस्कृतिक भवन येथे बैठक घेऊन 12 तासात समाज बांधवाना निरोप देऊन मोर्चाचे नियोजन केले. तीन हजार समाज बांधक एकत्र येत मोर्चा काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.