आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदलीस विरोध:मनपा शिक्षकांचा बदलीस विरोध, 40 गुरुजी रडारवर

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा शिक्षण मंडळाच्या शाळांच्या मागील दहा वर्षांपासून बदल्या झालेल्या नाहीत. त्या बदल्या प्रस्तावित आहेत. काेणत्या-कोणत्या कारणांमुळे बदल्या थांबवलेल्या आहेत. काही शिक्षकांनी अतिरिक्त कामाचा ताण नको म्हणून बदलीस विरोधही दर्शवला आहे. परंतु प्रशासनाकडून बदलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. त्यामुळे कन्नड,तेलुगु,मराठी व उर्दूच्या एकूण ४० शिक्षकांच्या बदली केल्या जाणार आहेत.

मनपाच्या एकूण ५८ शाळा असून त्यामध्ये साधारणपणे २११ शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील काही शिक्षक आठ ते दहा वर्षांपासून एकाच शाळेवर आहेत. ज्या मोठ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यासाठी स्वत:हून प्रवास खर्च करीत आहेत. एका शिक्षकाला साधारणपणे दहा ते पंधरा हजार रुपये विद्यार्थ्यांच्या प्रवास खर्चाला द्यावे लागतात. ही प्रवास खर्चाची कटकट कशाला. काही शिक्षकांनी बदलीस विरोधही दर्शवला आहे तर काही जण बदल्यांचे स्वागत करीत आहेत. बदल्यांच्या संदर्भात पालिका उपायुक्त व मनपा शिक्षण मंडळांशी संपर्क केला असता प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली आहे.

सध्या प्रशासनाकडून दोन प्रकारच्या शिक्षकांची बदली करण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये एखादा शिक्षक दहा वर्षापासून एकाच शाळेत असेल,तो शिक्षक बदलीसाठी पात्र असणार की? एकूण असलेल्या पदांपैकी १० टक्के प्रमाणे बदली करायची हा विचार सध्या प्रशासनामध्ये सुरू आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारे चर्चा करूनच बदली करण्याचे नियोजन केले जाणार आहे. या बदल्या कोणताही गालबोट न लावता करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला आहे. मात्र काही शिक्षक संघटनांनी बदली करण्यास विरोध दर्शवत बदल्या करू नये यासाठी निवेदनही दिले आहे.

ऑनलाइन पद्धतीनेच बदल्या अपेक्षित
सरकार नियमानुसार एकाच शाळेत तीन किंवा पाच वर्षे अध्यापन केलेल्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. या बदल्या एप्रिल किंवा मे महिन्यातच होणे अपेक्षित असते. मात्र सध्या बदल्या करण्यासाठी सप्टेंबर उजाडला आहे. २००९च्या शासन निर्णयानुसार ऑनलाइन पद्धतीनेच बदल्या करणे अपेक्षित आहे. बदल्या ऑफलाइनच का? हा घाट कुणासाठी घातला जातोय, असा सवाल शिक्षक संघटनांचा आहे.

बातम्या आणखी आहेत...