आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरविकास मंत्रालयाकडून पत्र:परिवहनच्या 419 सेवकांना जुनी पेन्शन लागू करण्याचे आदेश

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका परिवहन विभागातील १९८७, ९२ आणि २००० कालावधीत रोजंदारीचे ४१९ सेवकांची प्रतीक्षा यादी तयार केली असून, त्यांची रोजंदारी सेवा ग्राह्य धरून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महापालिका स्तरावर निर्णय घ्यावे, असा आदेश नगरविकास मंत्रालयाकडून महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना देण्यात आला. याबाबत १३ आॅक्टोबर राेजी शासनाने पत्रक काढले आहे.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महापालिकेने मागील सेवा ग्राह्य धरून पेन्शन लागू करण्याबाबत पालिका सभागृहात निर्णय घेतल्याचे दिसून येते. ४१९ सेवकांना जुनी पेन्शन याेजना लागू करण्यासाठी पालिकेने आपल्या स्तरावर तपासणी करावी. १५ डिसेंबर २०२० रोजी पालिका सभागृहात पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव झाला आहे. ताे ठराव आयुक्तांनी शासनाकडे विखंडीत करण्यासाठी पाठवणे गरजेचे हाेते पण तसे झाले नाही. हे सर्व निर्णय पाहता, परिवहनच्या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यानुसार शासनाने आदेश काढला आहे.

शहरात परिवहनची सेवा कोलमडली असून, त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. २०० बस भंगारात काढल्या असताना सत्ताधारी त्यांची चौकशी करण्यासाठी तयार नाहीत. नागरिकांना परिवहन सेवा नाही. अशा स्थितीत परिवहन सेवकांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, यामुळे परिवहनवर बोजा पडणार आहे. परिवहन सेवकाबरोबर नागरिकांच्या प्रश्नाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...