आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश‎:सुदीप चाकोते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश‎

सोलापूर‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्त पोलिस निरीक्षक मेहबूब‎ मुजावर यांचे अपहरण करून‎ मारहाण केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे‎ सुदीप चाकोते यांच्यासह अन्य‎ दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे‎ आदेश न्यायालयाने सदर बझार‎ पोलिसांना दिले आहेत.‎ २ ऑक्टोबर २०२२ रोजी मुजावर‎ हे नमाज पठणसाठी जात असताना‎ सुदीप चाकोते यांनी मुजावर याना‎ अडवून रिव्हॉल्व्हरच्या बटने‎ मारहाण केली होती.

याबाबत‎ मुजावर यांच्या तक्रारीनंतर अदखल‎ पात्र गुन्हा दाखल झाला होता.‎ त्यामुळे मुजावर यांनी न्यायालयात‎ खासगी फिर्याद दाखल केली.‎ युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य‎ न्यायदंडाधिकारी व्ही. आय. भंडारी‎ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश‎ दिले. या प्रकरणी फिर्यादीतर्फे अॅड.‎ डी.एन. भडंगे व अॅड. एन.एन.‎ भडंगे यांनी काम पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...