आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Organic Farming Is The Production Of Fertilizers By Women In Self Help Groups; Earnings Were Good From The Sale Of Fertilizers |marathi News

दिव्य मराठी विशेष:सेंद्रिय शेती अन् खतांची निर्मिती करताहेत बचत गटांतील महिला; खतांच्या विक्रीतून चांगली होते कमाई

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गातील घटकांचा वापर करत जिल्ह्यातील १०० हून अधिक महिला बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला सहाय्यक खतांची निर्मिती करण्याचे काम करत आहेत. रासायनिक खतांच्या वापराने आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहिल्या. रासायनिक खते टाळून निसर्गाकडे परत जावे हा विचार मूळ पकडत आहे. त्यामुळेच सेंद्रिय खतनिर्मितीला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या उमेद प्रकल्पाने या महिलांना प्रशिक्षण दिले. गावागावांत जाऊन महिला बचत गट तयार केले. यातून समूहाने केल्या जाणाऱ्या सेंद्रिय खतनिर्मिती उद्योगाचा ग्रामीण भागात मोठा प्रचार, प्रसार सुरू आहे. या बचत गटांच्या माध्यमातून गांडूळखत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, व्हर्मीवॉश अशी अनेक प्रकारची खते तयार करण्यात येत आहेत.

महूद येथील कडलास गावात नम्रता समूह गटात ४५ महिला हे काम करतात. मुक्ता आमले यांच्याकडे त्याचे नेतृत्व आहे. आलेगाव येथे फुलोरा महिला सेंद्रिय शेतकरी गटात ५० महिला काम करत आहेत. या गटाचे नेतृत्व सुनीता गडहिरे करतात. महूद येथील बळीराजा महिला सेंद्रिय शेतकरी गटात २० महिला काम करतात. ललिता माने यांचे सहकार्य असते. समृद्धी महिला सेंद्रिय शेतकरी गट गौडवाडी येथील ४३ महिला शारदा गडदे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत.

स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या महिला
आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. एका गटात २० - ३० महिला आहेत. या महिलांना या उत्पादनातून रोजगार मिळत आहे. सेंद्रिय शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय खते विकली आहेत. जीवामृत, गांडूळ खत व इतर अर्क तयार करण्यासाठी कमी खर्च येतो, मात्र विक्री चांगल्या पद्धतीने करता येते. त्यामुळे व्यवसायात फायदा होऊ शकतो.

एक चांगली संधी मिळाली
लॉकडाऊननंतर नेमके काय करावे याचा विचार सुरू होता. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आम्हाला हे काम करण्याची संधी मिळाली. आता हे काम वेगाने सुरू आहे. शिवाय याचा प्रचार, प्रसार आम्ही मोठ्या प्रमाणावर करत आहोत. शेतकरी महिला या प्रवाहात येण्याचे प्रमाण वाढले आहे.
सुनिता गडहिरे, आलेगाव महिला उद्योजिका

बातम्या आणखी आहेत...