आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:द्राक्ष उत्पादनासाठी जैविक खतांचा वापर गरजेचा; माढा तालुक्यातील निमगाव (टे.) येथे द्राक्ष पिकाची छाटणी व्यवस्थापनावर चर्चा

माढा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त जैविक खतांवरती भर द्यावा, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी व्यक्त केले.माढा तालुक्यातील निमगाव (टे.) येथील विठ्ठलगंगा फार्मर्स प्रकल्पाच्या क्षेत्रावर द्राक्ष पिकातील एप्रिल छाटणी व्यवस्थापन करण्या संदर्भात आयोजित संवाद कार्य शाळेत डॉ. सोमकुंवर बोलत होते.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे चेअरमन धनराज शिंदे होते.

डॉ. सोमकुंवर म्हणाले, द्राक्ष पिकावरती होणारे नवनवीन संशोधन आणि उपलब्ध शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवण्यासाठी द्राक्ष संशोधन केंद्र नेहमीच प्रयत्नशील आहे. क्लोन ही द्राक्षाची जात शेतकऱ्यांना बेदानासाठी फायद्याची ठरत आहे. त्याचबरोबर मांजरी किसमिस ही जात बेदाणा निर्मितीसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. शेतकऱ्यानी या जातीस पसंती देऊन मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे आवाहन सोमकुंवर यांनी केले. द्राक्ष उत्पादनातील सूर्यप्रकाशाचे महत्व या विषयावर मार्गदर्शन त्यांनी केले.

वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. निशांत देशमुख म्हणाले, द्राक्ष वेलींना मुबलक सूर्यप्रकाश मिळाल्यास जास्त प्रमाणात प्रकाश संश्‍लेषण क्रिया घडून येते पर्यायी कार्बोहायड्रेटचे संचयन होऊन उत्पादनात भरघोस वाढ होते. मंडळ कृषी अधिकारी संजय पाटील, प्रकल्पाचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, कंपनीचे संचालक पोपट खापरे, नितीन कापसे, महेश मारकड, महेश डोके, प्रशासकीय अधिकारी राहुल वरपे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...