आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्य चारोळी स्पर्धेचे आयोजन:निसर्ग-समाज आणि मानवी भावनांवर व्यक्त झाले कवी, वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मला मठपती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या काव्य चारोळी स्पर्धेत वैविध्यपूर्ण विषयांची मांडणी केली. नवोदित कवींसाठी आयोजित करण्यात आलेल्या चारोळी स्पर्धेत नदीम शेख, काव्यपूर्ती स्पर्धेत शीला पत्की तर काव्य स्पर्धेत वैशाली जोशी यांना प्रथम क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली.

विजापूर रोडवरील आयटीआय चौकी जवळील 'एविस कॉम्प्युटर्स'येथे रविवार 31 जुलै रोजी सकाळी जिल्हा पातळीवरील दोन गटात काव्य स्पर्धा व चारोळी स्पर्धेतील विजेत्यांना खास कार्यक्रमात पारितोषिके देण्यात आली. या तीनही स्पर्धेत मिळून एकूण 51 स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ साहित्यिका वंदना कुलकर्णी, तर अध्यक्षा म्हणून डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर या उपस्थित होत्या. प्रा. डॉ. नसीमा पठाण यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. चारोळी स्पर्धा शेख नदीम, प्रांजली मोहीकर यांनी तर काव्यपूर्ती या स्पर्धेसाठी निर्मला मठपती यांच्या कवितेच्या दोन ओळी देण्यात आल्या होत्या. त्या वरून दोन ओळींची सात-आठ कडव्यांची कविता पूर्ण करणे अशी स्पर्धा होती.

यांनी पटकावला क्रमांक

शीला पत्की, माधवी मिलींद अभ्यंकर तर अनुक्रमे प्रथम द्वितीय पारितोषिक तर खुल्या काव्य स्पर्धेत वैशाली विजया मनगिरे यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. उत्तरेश्वर मठपती यांनी प्रस्तावना वडगबाळकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्या वंदना कुलकर्णी, अध्यक्षा डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर व विशेष अतिथी डॉ. नसीमा पठाण यांचे मनोगत झाले. शिवांजली स्वामी व अविनाश मठपती यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...