आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्प, चित्रांचे आज प्रात्यक्षिक‎:जिल्हा अभिनव आर्टिस्ट‎ संस्थेच्या वतीने आयोजन‎

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला‎ दिनानिमित्त सोलापूर जिल्हा‎ अभिनव आर्टिस्ट सहकारी‎ संस्थेच्या वतीने महिला सभासद‎ आर्टिस्ट चित्र निर्मितीचे प्रत्यक्ष‎ सादरीकरण करणार आहेत. तर‎ याच प्रसंगी शिल्प प्रात्यक्षिक‎ सादरीकरण होणार आहे.‎ चित्रकला, डॉ. पद्मा देशपांडे.‎ मीनाक्षी रामपुरे, वर्षा निरंजन -‎ बाकळे, सोनाली रामपुरे, अंजली‎ स्वामी या महिला चित्रकार रचना‎ चित्राचे सादरीकरण करणार आहेत.‎ तर शिल्प प्रात्यक्षिक नितीन जाधव‎ महिला मॉडेलचे प्रत्यक्ष शिल्प‎ साकारणार आहेत. हा कार्यक्रम दि.८‎ रोजी सांय. ५:०० वाजता हिराचंद‎ नेमचंद वाचनालयाच्या प्रांगणात‎ होणार आहे. कला रसिकांनी या‎ चित्र-शिल्प सादरीकरणाच्या‎ कार्यक्रमास उपस्थित राहून कला‎ निर्मितीचा आनंद घ्यावा, असे‎ आवाहन संस्थेच्या सर्व सभासद‎ आर्टिस्टच्या वतीने केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...