आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात सायक्लोथॉन रॅली:विविध भागातील नागरिकांचा सहभाग, सोलापुरकरांचा रॅलीला उत्फुर्त प्रतिसाद

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नविन वर्ष पर्यावरणपुरक पध्दतीने साजरे व्हावे, सर्वांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे यासाठी नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी सायक्लोथॉन आयोजित करण्यात आले. या रॅलीमध्ये शहराच्या विविध भागातून अनेकजण सायकलिंग करत सहभागी झाले होते. या उपक्रमाला सोलापूरकरांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीच्या प्रारंभी दाेन तरुणांनी तिरंगा हातात घेऊन सायकलिंग केली.

माझी वसुंधरा अभियान 3.0 व राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम अंतर्गत महानगरपालिका पर्यावरण विभाग व रॉयल रायडर्स ग्रुप, स्मार्ट सोलापूरकर सोलापूर यांच्यावतीने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी १ जानेवारी 2023 रोजी सकाळी सहा वाजता ‘सोलापूर सायक्लोथॉन 2023’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायक्लोथॉन 2023 च्या निमित्ताने नविन वर्ष पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करण्याचा संकल्प करण्यात आले. ही रॅली लहानांसाठी 7 किलोमीटर आणि मोठ्यांसाठी 12 किलोमीटर सायकलिंग ठेवण्यात आले होते.

महापालिकेच्या आवारातून मनपा उपायुक्त विद्या पोळ व चित्रकार सचिन खरात यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. सहभाग घेतलेल्या सर्वांची पिवळी टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट अशी वेषभूशा होती. मुलींचाही सहभाग लक्षणीय होता. लहान मुलांची सहभाग सुध्दा माेठा हाेता.

असा होता मार्ग

ही रॅली मनपा ते भैया चौक ते शिवाजी चौक ते बळीवेस ते राजेंद्र चौक ते सिव्हिल चौक ते रंगभवन चौक ते सात रस्ता मार्गे महावीर चौक ते पत्रकार भवन ते सात रस्ता मार्गे एम्प्लॉयमेंट चौक ते डफरीन चौक मार्गे येऊन महापालिकेतच समारोप करण्यात आले. येथे आल्यानंतर सर्वांना स्नॅक्स देण्यात आले. शहराच्या विविध भागातून सायकलिंग करीत अनेकजण या उपक्रमांत सहभागी झाले होते. सोलापूर महानगरपालिकेचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर, उद्यान प्रमुख रोहित माने, रॉयल रायडर्सचे अभिनय बावठनकर व सोमपा विभाग प्रमुख यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी आणि सायकल प्रेमी माेठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...