आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय, निमशासकीय कार्यालये, पोलिस ठाणे, महापालिका, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग येथे कामासाठी नागरिकांना वारंवार जावे लागते. अनेकदा कामासाठी पैशांची मागणी होते. अधिकारी, कर्मचारी लाच मागतात. त्यातील काहीजण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडतात. काहीजण लाच घेऊनही जाळ्यात सापडत नाहीत. मागील १६ महिन्यांत १४ पोलिसांसह २८ जण लाच घेताना सापडले. लाच प्रकरणांत शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ १८ ते २० टक्के इतकेच आहे. आरोपी जाळ्यात सापडला तरी गुन्हा सिद्ध होत नाही. तपासात विसंगती, पंच, साक्षीदार, घटनास्थळाचा पंचनामा अशा विविध बाबींमध्ये विसंगती असते, यामुळे अनेकदा गुन्हा सिद्ध होत नाही. पुरावा म्हणून संवाद किंवा कागदोपत्री पुरावा अनेकदा जुळत नाही. लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर एसीबी पथक कारवाई करते. आरोपीला शिक्षा लागावी, गुन्हा सिद्ध व्हावा, यासाठी तपास करतात. मागील महिनाभरापासून एक पोलिस शिपाई, महापालिका शिक्षण विभागातील लिपिक आणि मंगळवेढा येथील तहसील कार्यालयातील, पुरवठा विभागाचे दोघेजण (एक खासगी व्यक्ती), महसूल विभातील दोनजण असे सहाजण लाच घेताना सापडले आहेत. मागील सोळा महिन्यांचा विचार केल्यास तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, हरीश बैजल यांनी प्रशासनावर अंकुश ठेवला होता. तरीही लाच घेताना पोलिस सापडले आहेत. याशिवाय १४ पोलिसांपैकी काही पोलिस ग्रामीण पोलिस दलातील आहेत.
पुरावा आणि घटनास्थळाचा पंचनामा महत्त्वाचा ^शासकीय, निमशासकीय कार्यालयात लाच मागितली म्हणून काहीजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात. काही तक्रारी निष्पन्न होत नाहीत. केवळ पुरावा नसल्याने आणि घटनास्थळाचा पंचनामा करताना त्रुटी राहिल्याने केसेस अनेकदा सिद्ध होत नाहीत. जवळपास ८० टक्के प्रकरणात आरोपी निर्दोष होतात. लाच मागणी, स्वीकारणे, कारवाई या तीन गोष्टी समांतर पद्धतीने झाल्यास आरोप सिद्ध होतो. परिस्थितीजन्य पुरावा, घटनास्थळाचा पंचनामा पुरावा महत्त्वाचा असतो.'' अॅड. अश्विनी कुलकर्णी
विभाग गुन्हे आरोपी पोलिस ८ १२ ग्रामपंचायत ३ ५ नगरपंचायत २ २ जिल्हा परिषद २ २ राज्य कर विभाग १ १ महानगरपालिका १ १ आरोग्य विभाग १ १ एमएसईबी १ १ महसूल १ १
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.