आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटनास्थळी धाव:नैराश्यातून तिची तलावात उडी, तरुणांनी काढले बाहेर ; प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

साेलापूर / रामदास काटकर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवारी सकाळची साडेदहाची वेळ... धर्मवीर संभाजी महाराज तलावात गणेशमूर्ती विसर्जनाची तयारी सुरू हाेती... त्या कामात काही तरुण बांबू घेऊन सहभागी झाले हाेते... तितक्याच एका तरुणीने तलावात उडी घेतल्याचा आवाज आला... त्या दिशेने ही मंडळी धावून गेली... बांबूने तिला किनाऱ्याकडे ढकलून बाहेर काढले... बांबूनेच का काढले, याचे उत्तर देताना तरुण म्हणाले, ‘‘आम्हाला कुठे पाेहायला येते...?’’ पाेहायला येत नसतानाही त्यांनी दाखवलेले धाडस मात्र सर्वांना अचंबित करून गेले.

सचिन माेरे, इस्माइल शेख आणि मामू शेख अशी या तरुणांची नावे. ते ज्या ठिकाणी विसर्जनाची तयारी करत हाेते, त्यापासून काही अंतरावरच ही घटना झाली. विजापूर रस्त्यावरील एका नगरातील ही विवाहिता आहे. पाेलिस नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्या महिलेची विचारपूरस केली. तिने घरगुती भांडणाचे कारण देत करुण कहाणी मांडली. माझे आई, वडील या जगात असते तर त्यांच्याकडे तरी जाऊन राहिले असते. पंरतु मला काेणीच नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला. दाेन लहान मुले आहेत. तुम्ही मला वाचवले तरी माझा त्रास संपणार नाही, असे ती हुंदके देतच सांगत हाेती. तिला पाेलिसांनी ठाण्यात नेले. तिथे तिचा जबाब घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...