आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारी विरुद्ध युवकांचा आक्रोश:दिल्लीच्या संसद मोर्चासाठी सोलापुरातून युवक रवाना

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या बेरोजगारी विरूध्द सबंध देशभर असंतोष पसरलेला आहे याला केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. देशात मोदी सरकार सतेत आल्यापासून तरूणाईची घोर निराशा झाली आहे. सर्व शासकीय व निम शासकीय नोकर भरती बंदी असल्यामुळे दिवसागणिक बेरोजगारीचा उच्चांक चढत्या क्रमाने वाढत आहे.

नोकरीच्या संधी देऊ,प्रत्येक युवकांच्या हाताला रोजगार देऊ अशा पोकळ गप्पा मारणाऱ्या इव्हेंटबाज आणि जाहिरातबाज सरकारचा हा डाव रोखणे नितांत गरजेचे आहे याच अनुषंगाने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया केंद्रीय समितीच्या वतीने 3 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे संसद मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी सोलापुरातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

हा मोर्चा जतंरमतंर ते ससंदेवर धडकणार आहे यामध्ये देशभरातून हजारो युवक सामील होणार आहेत सोलापूरातुनही बेरोजगारीचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी युवक दिल्ली कडे रवाना होत असल्याची माहिती युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्हकोट अनिल वासम यांनी दिली.

युवा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने बुधवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या संसद मार्च साठी जाणाऱ्या युवकांच्या मोर्चाला ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर रेल्वे स्थानक येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिले.

यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण मल्याळ राज्य समिती सदस्य विजय हरसुरे, मधुकर चिल्लाळ, मनोज महेशन ,प्रभाकर गेंट्याल, राहुल बुगले बानूचंद्र मॅकल अप्पाशा चांगले यश मल्याळ महेश मल्याळ सनी कोंडा शिवानंद चिटमील नरेश गुल्लापल्ली, लक्ष्मण आडम आदी सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...