आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे संकट:ऑक्सिजन प्लांट दीड वर्षापासून बंदच; वापराविना यंत्रे निकामी होण्याचा धोका

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेल्या ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठ्याची क्षमता तिपटीने वाढवली. ऑक्सिजन निर्मिती व साठवणूक करणाऱ्या नव्या १० प्लांटची उभारणी केली. परंतु सध्या मागणी नसल्याने सिव्हिल हॉस्पिटल वगळता इतर ठिकाणचे ऑक्सिजन प्लांट बंद आहेत. त्या; यंत्रसामग्री खराब होऊ नये म्हणून प्लांटची यंत्रणा कार्यरत ठेवण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालय करमाळा व पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय माळशिरस, उपजिल्हा रुग्णालय अकलूज, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चार प्लांट, महापालिकेच्या वतीने विमा हॉस्पिटल, बाॅइस प्रसूतिगृह येथे प्लांट उभारले. एकूण १२३० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती क्षमता आहे. एवढ्या प्रमाणात तयार होत असेल ते खासगीच्या दवाखान्यात विकता येईल का, या दृष्टीने विचार होण्याची गरज आहे. जिल्ह्यात शासकीय दवाखान्यात साठवणूक करण्यासाठी १४ ठिकाणी टँक बांधले. त्यात सिव्हिल सर्जन कार्यालयाकडील पंढरपूर, बार्शी, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला, माढा, मंद्रूप तर जिल्हा आरोग्य विभागाकडील कंदलगाव, पुरुंदवढे व कोंडी येथील टँकचा समावेश आहे. तसेच सिव्हिलमध्ये एक व महापालिकेकडे दोन टँक आहेत. त्यात १३३ मेट्रिक टन साठवणूक होते. सिलिंडरमधून १९ मेट्रिक टन असे मिळून एकूण १९० मेट्रिक टन क्षमता होते. मात्र जिथे निर्मिती होते तेथील वगळता उर्वरित टँक रिकामे ठेवले आहेत.

आॅक्सिजन प्लांटच्या यंत्रात बिघाड होणार नाही ^हवेतून ऑक्सिजन निर्माण करणारे प्लांट नियमित चालू करण्यात येत आहेत. त्यामुळे बिघाड होणार नाहीत. ऑक्सिजन हॉस्पिटलला जोडलेल्या पाइपमधून थेट रुग्णांना देण्यात येतो. त्या ठिकाणच्या प्लांटमधून बॉटलिंग करता येत नाही. त्यासाठी वेगळी मशीन बसवावी लागते. हे प्लांट उभारणीसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे.”' मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर

इतरांना देण्यासाठी नवी यंत्रणा, मनुष्यबळ लागेल ^कोविड काळात रोज ६० मे. टन ऑक्सिजनची गरज होती. सध्या रुग्ण नसल्याने रोज १० ते १२ टन ऑक्सिजनची मागणी आहे. सरकारी ऑक्सिजन प्लांटमधून फक्त हॉस्पिटलमधील रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येतो. इतर ठिकाणी विकता येत नाही. त्यासाठी वेगळी यंत्रणा बसवावी लागते. तसेच ऑक्सिजनची शुध्दता, वाहतुकीसाठी टँकर, स्टोरेजची सोय करावी लागते. त्यासाठी कुशल मुनष्यबळ आवश्यक असते.”' प्रमोद तमन्नावार, महालक्ष्मी ऑक्सिजन कंपनी

बातम्या आणखी आहेत...