आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रात्यक्षिकेतून युवकांनी घेतले चित्रकलेचे धडे:काडादी चित्रकला महाविद्यालयात चित्रप्रदर्शन सुरू

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणेश चतुर्थीनिमित्त चित्रप्रदर्शन व प्रात्यक्षिक झाले. चित्रकार प्रकाश पोरे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले.चित्रप्रदर्शन ४ सप्टेंबरपर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वासाठी खुले आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य दीपक पाटील यांनी केले आहे.

चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील उपस्थित होते. पहिल्याच दिवशी गुरुवारी चित्रकार प्रकाश पोरे यांचे प्रात्यक्षिकांबरोबर त्यांनी रंगसंगतीबरोबर, रेखाटनातील बारकावे, विविध माध्यमातील चित्र याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.चित्रप्रदर्शन ४ सप्टेंबरपर्यंत सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वासाठी खुले आहे. एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य दीपक पाटील यांनी केले आहे.

चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ. शोभा राजमान्य, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य दीपक पाटील उपस्थित होते. पहिल्याच दिवशी गुरुवारी चित्रकार प्रकाश पोरे यांचे प्रात्यक्षिकांबरोबर त्यांनी रंगसंगतीबरोबर, रेखाटनातील बारकावे, विविध माध्यमातील चित्र याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.३ सप्टेंबर रोजी चित्रकार विनायक घाडगे यांचे कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक होणार आहे. सुलेखनातील बारकाव्यांसोबत कॅलिग्राफिक क्षेत्रातील संधी याविषयी ते मार्गदर्शनही करतील. या प्रात्यक्षिकाचा आणि विद्यार्थ्यांच्या चित्र प्रदर्शनाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...