आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त शिवशंकर यांची माहिती:पनाश अपार्टमेंटविषयी विकसकाने दिलेल्या माहितीचा अभ्यास करणार

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटचे विकसक गॅलार डेव्हलपर्सचे अमित थेपडे यांनी महापालिका सहायक नगर रचना विभागाने दिलेल्या नोटिसीला उत्तर दिले आहे. जागेवर डिस्ट्रिक सेंटरचे आरक्षण होते. त्यांच्यासाठी पालिकेने करार केला होता. १६०० स्वेअर मीटर जागा देणे आवश्यक असताना ५०० स्वेअर मीटर दिली म्हणून महापालिकेने नोटीस दिली होती.

विकसकाने दिलेल्या उत्तराचा अभ्यास नगर रचना अधिकारी सुहास कांबळे करत आहेत; दोन दिवसांत स्थिती स्पष्ट होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. दरम्यान, याविषयी विचारले असता, ‘तेथे डिस्ट्रिक सेंटरचे आरक्षण आहे. कराराप्रमाणे महापालिका अधिकाऱ्यांना दाखवून त्यांच्या पसंतीनुसार जागा दिली आहे. मार्केटचे आरक्षण माझ्या जागेवर नाही. ते मागील बाजूस आहे. त्यामुळे त्या आरक्षणापोटी जागा देणे लागत नाही. महापालिकेने दिलेली नोटीस चुकीची असून, त्याबाबत महापालिकेस उत्तर दिले. ३८१ स्वेअर चौरस मीटर जागा देणे असताना रस्त्यापोटी जागा मागत ४९६ स्वेअर मीटर जागा घेतली. त्यांच्या पसंतीनुसार जागा दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...