आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवराज्याभिषेक दिन विशेष:सोलापूरमध्ये शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजरा

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस 6 जून 1674 म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन. या शुभ दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास विभाग सूचनेप्रमाणे शिवशक राजदंड स्वराज्यगुढीची उभारणी पंचायत समिती दक्षिण सोलापूरच्या आवारात प्रशासक तथा गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते उभारण्यात आली.

महाराजांचे केले पूजन

श्री. शिवछत्रपती महाराज यांचे प्रतिमेचे पूजन बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. स्वराज्य गुढीची विधीवत पूजा करून त्याची उभारणी सनई, पोवाड्याच्या निनादात जयघोषात करण्यात आली. गुढी उभारणी नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत पंचायत समिती दक्षिण सोलापूर शिक्षण विभागाकडील शिक्षक वृंदा मार्फत करण्यात आले.

मिष्ठान्न ​​​​​​केले वाटप

या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व कर्मचाऱ्यांना बाळासाहेब वाघ यांचे शुभहस्ते मिष्ठान्न वाटप करण्यात आले. वाघ यांनी या प्रसंगी शिवस्वराज्य दिनाची पार्श्वभूमी च्या अनुषंगाने सर्वांना शिवराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांनी तर सूत्रसंचालन संजय सावंत तर आभारप्रदर्शन मल्हारी बनसोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विरुपाक्ष जेऊरे, अप्पाराव गायकवाड, सुनिता लाबतुरे, शोभा तडलगी, विकास म्हेत्रे, नागेश कदम, कैलास जींदे बाळासाहेब म्हमाने ,जनार्दन खांडेकर नरेंद्र सरवदे, रिमा पवार, शकुंतला जाधव, रवी इगलोर, आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...