आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस म्‍हणाले:घरे, मठ-मंदिरे पाडण्याचा पंढरपूर काॅरिडाॅर नाही, ही केवळ अफवा

पंढरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर काॅरिडाॅरसंदर्भात सुरू झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी साेलापुरात स्पष्टीकरण दिले. पाचशे घरे ताेडणार, मठ-मंदिरे पाडणार असे नाही. या केवळ अफवा अाहेत. वारकऱ्यांना सुखसुविधा देणारा भव्यदिव्य असा हा प्रकल्प असेल, असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. राष्ट्रीय गुरव महासंघाच्या महाअधिवेशनासाठी ते साेलापूरला अाले हाेते. तेथील भाषणातच त्यांनी पंढरपूर काॅरिडाॅरविषयी स्पष्ट खुलासा केला. म्हणालेे, ‘या प्रकल्पातून कुठलाही घटक उद्ध्वस्त हाेणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊनच या विकास कामाला पुढे नेऊ. अफवा पसरवणाऱ्यांना माझी हात जाेडून विनंती अाहे, की त्यांनी प्रकल्प समजून घेतला पाहिजे. साेलापूर ही अध्यात्म नगरी अाहे. ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांचे मंदिर, पंढरीचा पांडुरंग, अक्कलकाेटचे स्वामी समर्थ अशी तीर्थक्षेत्रे आहेत. पंढरीच्या विकासात वाद नकाे.’

बातम्या आणखी आहेत...